कोल्हापूर मध्ये श्री अंबाबाई भक्त मंडळ यांचे माध्यमातून मोफत अन्नछत्र सुरु आहे. या मंडळाची नोंदणी झाले पासून सात वर्षापासून मंडळाचे हॉल मध्ये दररोज महाप्रसाद दिला जातो.कोल्हापूरचे सुप्रसिद्ध मूर्तीकार श्री.अशोक सुतार यांनी मंडळास श्री अंबाबाई मूर्ती दान केली आहे. सदर मुर्ती अन्नछत्र हॉल असून श्री अंबाबाई मुर्तीची रोज सकाळी पुजा होऊन सकाळी ११ वा. आरती व महाप्रसाद देवीस दाखवून येणाऱ्या भक्तांना व परगांवचे भक्तांना महाप्रसाद दिला जातो. लहान बाळासाठी मोफत दुधाची व्यवस्था केलेली आहे. या मोफत अन्नछत्रामध्ये सकाळी १२ ते दुपारी २ वाजेपर्यत परगांवचे भाविक मोठ्या प्रमाणात लाभ घेत आहेत. या अन्नछत्रामध्ये परगांवचे भावीक मोठ्या प्रमाणात येत असलेने त्यांना कोल्हापुरातील प्रेक्षणीय स्थळाची माहिती दिली जाते.श्री अंबाबाई भक्तांना सेवाभावी पध्दतीची वागणूक दिली जाते.मंडळ हे अन्नदान श्रेष्ठदान या भावनेने कार्य करीत आहे.
श्री अंबाबाई अन्नछत्र महाप्रसाद ( अन्नदान ) सेवेत असंख्य भविक यथाशक्ती अन्नदानास देणगी देवून सहभागी होत आहेत.
संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त सकल सौभाग्यदायी कुंकुमार्चन उपासनेचे आयोजन केले जाते.
श्री अंबाबाई अन्नछत्र तर्फे दरवर्षीप्रमाणे रामनवमी उत्सव साजरा केला.
श्री अंबाबाई अन्नछत्र तर्फे आरोग्यशिबीर
श्री गणेश विसर्जन मिरवणूक वेळी भक्तांना प्रसाद वाटप
श्री अंबाबाई मंदिरसमोरील महाद्वार चौकात चैत्र पौर्णिमे दिवशी नववर्ष म्हणून गुढी उभी केली.
MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन नुकत्याच अधिकारी झालेल्या नवदुर्गा महिलांचा सन्मान व सत्कार झाला
A/c Name : Shri Ambabai Bhakta Mandal, Kolhapur
A/c No. : 60331108740
Branch Name : Timber Market, Kolhapur.
IFSC Code : MAHB0000326